एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता इयत्ता 6 वी ते 9 वी च्या वर्गामध्ये अनुशेष भरुन काढण्यासाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन

एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता
इयत्ता 6 वी ते 9 वी च्या वर्गामध्ये अनुशेष भरुन काढण्यासाठी स्पर्धा परिक्षेचे आयोजन

गडचिरोली, दि.20: प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी, जि. गडचिरोली यांचे कार्यक्षेत्रा अंतर्गत अहेरी/मुलचेरा/सिरोंचा हे तीन तालुके येत असुन सदर तालुक्यातील इयत्ता 6 वी, 7 वी, 8 वी, 9 वी मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या अनुसुचित जमातीच्या व आदिम जमातीच्या विद्यार्थ्या करीता एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेश घेण्याबाबत इच्छुक पालकांनी विहित नमुन्यात अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी व शासकीय / अनुदानित/ आदिवासी मुला/मुलींचे वसतीगृह येथून विनामुल्य अर्ज प्राप्त करुन दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करावे. इयत्ता 6 वी 9 वी प्रवेश मिळण्याकरीता अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहे. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छीत विद्यार्थी अनुसुचित जमाती/आदिम जमातीचा असावा. पालकांचे सक्षम अधिका-याने दिलेले अनुसुचित जमातीच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत सादर करावी. कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 6 लक्ष इतके मर्यादित राहील. पालक दारिद्रय रेषेखाली असेल तर त्या संबधाचा दाखला जोडावा. शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये इयत्ता 5 वी तसेच 6 वी ते 8 वी चे वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसुचित जमातीच्या व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांचे निवड स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातुन करण्यात येईल. व गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांनाच प्रवेश देता येईल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश कोणत्याही वेळी रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांला एकदा शाळा निश्चित झाल्यानंतर कोणत्याही परीस्थितीत पालकांच्या व पाल्यांचा विनंती नूसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकांनी हमी पत्र सादर करावे. असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (प्रशासन), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी जि. गडचिरोली यांनी कळविले आहे.