chandrapur I शिवराज्‍यभिषेक दिन सोहळा समस्‍त महाराष्‍ट्राची अस्मिता – आ. सुधीर मुनगंटीवार

शिवराज्‍यभिषेक दिन सोहळा समस्‍त महाराष्‍ट्राची अस्मिता – आ. सुधीर मुनगंटीवार

महानगर भाजपाने साजरा केला शिवराज्‍यभिषेक दिन
 
 सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्‍याभिषेक सोहळा पार पडला आणि ख-याअर्थाने हिंदवी स्‍वराज्‍याची मुहुर्तमेढ रोवली गेली. १६७० च्‍या सुमारास रायगड राजधानी करण्‍याच्‍या दृष्‍टीने शिवाजी महाराजांनी निर्णय घेतला. ६ जून १६७४ ला राज्‍याभिषेक सोहळा पार पडला. तेव्‍हापासून हा मंगलमय दिवस राज्‍यभिषेक दिन साजरा केला जात आहे. या सोहळयामुळे महाराजांच्‍या कर्तृत्‍वाला राजमान्‍यता मिळाली. सोनियाचा दिन म्‍हणून साडेतीन शतकानंतरही हा शिवराज्‍यभिषेक दिन सोहळा समस्‍त महाराष्‍ट्राची अस्मिता म्‍हणून आजही थाटामाटात साजरा केला जातो, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरतर्फे रविवार (६ जून) ला आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली’ कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक चंद्रपूर येथे शिवाजी महाराजांच्‍या प्रतिमेला मार्ल्‍यापण करून आदरांजली अर्पण करीत असताना ते बोलत होते.
 
यावेळी भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती अध्‍यक्ष रवि आसवानी, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते प्रमोद कडू, भाजपा कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, भाजपा मंडळ अध्‍यक्ष सचिन कोतपल्‍लीवार, रवि लोणकर, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, महामंत्री प्रज्‍वलंत कडू, नगरसेविका शितलताई आत्राम, प्रशांत विघ्‍नेश्‍वर, राजेंद्र खांडेकर, यश बांगडे, रामकुमार अकापेल्‍लीवार यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.