पोलीस मुख्यालय सभागृहात होणार  तरूणाईचा जल्लोष 

जिल्हास्तर युवा महोत्सव 22 नोव्हेंबरला

बहुउद्देशिय पोलीस मुख्यालय सभागृहात होणार  तरूणाईचा जल्लोष 

        भंडारा  दि.17 :युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सन 2023-24 या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व कृषी

        आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करुन राज्याचा प्रतिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येईल. युवा महोत्सवामध्ये (1) सांस्कृतीक, समुह लोकनृत्य, वैयत्किक सोलो लोकनृत्य, लोकगीत,वैयक्तीक सोलो लोकगीत, (2) कौशल्य विकास, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी, फोटोग्राफी, (3) संकल्पना आधारीत स्पर्धा, तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान, (4) युवा

        कृती, हस्तकला, वस्त्रोद्योग, ॲग्रो प्रोडक्ट या स्पर्धात्मक बाबींचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी 15 ते 29 वयोगट राहील. (1 एप्रिल 2023 रोजी वयाबाबत परिगणना करावी.), जिल्ह्यातील कृषि महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ, युवा मंडळे तसेच 15 ते 29 वयोगटातील युवांना सदर युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी पात्रता राहील. महाराष्ट्राचा रहिवासी असावा. स्पर्धकांनी नाव, पत्ता, जन्म दिनांक, संपर्क क्रमांक, ई-मेल आयडी व वयाबाबतचा सबळ पुरावा सुध्दा सादर करणे आवश्यक आहे. सहभागी

          युवक, युवतींना सहभाग व प्राविण्य प्रमाणपत्र सुध्दा वितरीत करण्यात येईल. तसेच युवा महोत्सवातील प्राविण्य धारकांसाठी रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत. करीता भंडारा जिल्ह्यातील 15 ते 29 या वययोगटातील युवक, युवतींनी दि.21 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 03.00 वाजता पर्यंत आपला प्रवेश निश्चीत करावा.

         दि.22 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 09.00 वाजता बहुउद्देशिय पोलीस मुख्यालय सभागृह, भंडारा येथे होणाऱ्या जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये भंडारा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, आय.टी.आय महाविदयालय, कृषी महाविद्यालय,संस्था,महिला मंडळ यांनी आपल्या अधिनस्त युवक-युवतींना या जिल्हास्तर युवा महोत्सवामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याकरीता सुचित करावे तसेच अधिक माहितीकरीता श्री.योगेश खोब्रागडे,मो.क्र. 9326915209 यांचेशी संपर्क

साधावा असे आवाहन श्रीमती आशा मेश्राम जिल्हा क्रीडा अधिकारी,भंडारा यांनी केले आहे.