गडचिरोली : पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने अहेरीत शिवसेनेच्या वतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने अहेरीत शिवसेनेच्या वतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

 

सदाशिव माकडे
(गडचिरोली जिल्हा)

अहेरी :- पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य येथील इंदिरा गांधी (बेघर) कॉलनीत शिवसेनेच्या वतीने अन्न धान्य तसेच संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
शिवसेना पक्षाचे वरिष्ठ व ज्येष्ठ नेते पालकमंत्री ना.एकनाथराव शिंदे व पूर्व विदर्भ संघटक खासदार गजानन कीर्तिकर यांच्या प्रेरणेतून जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप व जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या सल्ल्यानुसार अहेरीत अन्न धान्य व संसारोपयोगी साहित्याचे किटचे अहेरी उपजिल्हा प्रमुख अरुण धुर्वे महिला आघाडीचे संघटिका पौर्णिमा इष्टाम यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे विदर्भ संघटक बिरजू गेडाम, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल येरणे, दिलीप सुरपाम, दीपक तोगरवार, सुभाष घुटे, तुळजाताई तलांडे, महेश मोहूर्ले आदी व शिवसैनिक उपस्थित होते.