जिल्हा परिषद भंडारा पदभरती वरीष्ठ सहायक  पदाची परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी

जिल्हा परिषद भंडारा पदभरती वरीष्ठ सहायक  पदाची परीक्षा 23 नोव्हेंबर रोजी

          भंडारा, दि. 17 :  जिल्हा परिषद, भंडारा येथील  विविध पदांच्या भरतीसाठी पहिल्या  टप्प्यात काही पदांची परीक्षा झाली असून आता आयबिपिएस संस्थेने दिलेल्या वेळापत्रकानुसार पुढील संवर्गाचे वेळापत्रक प्राप्त  झालेले आहे.त्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी, वरीष्ठ सहायक या संवर्गाची परिक्षा होणार आहे.

           भंडारा साईराम प्रा. शासकीय औद्योगिक संस्था, भंडारा, तुमसर स्व.अजय पार्डी  मेमो  प्रायव्हेट ‘शासकीय औद्योगिक संस्था, हसरा (तुमसर) नागपूर, या केंद्रावर परीक्षा होणार आहे.

            तसेच उर्वरीत संवर्गाच्या परिक्षेचे वेळापत्रक प्राप्त झाल्यानंतर प्रसिध्दी करण्यात येईल.तथापी उमेदवारांनी जिल्हा परिषद भंडाराच्या www.bhandarazp.org या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देऊन माहिती प्राप्त करुन घ्यावी.

         त्याकरिता परिक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र जिल्हा परिषदच्या   संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.त्यामुळे उमेदवारांनी त्यांची प्रत छापून घेऊन त्यातील सूचना प्रमाणे पुढील कार्यवाही करावी असे आवाहन जिल्हा निवड समिती तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य  प्रशासन विभाग ,जिल्हा परिषद भंडारा यांनी कळविले आहे.