एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेशासाठी अर्ज करावे

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेशासाठी अर्ज करावे

आदिवासी विकास विभागाचे आवाहन

 

          भंडारा दि.17 : नागपूर विभागतील एकलव्य रेसिडेंशियल स्कुल खैरीपरसोडा,बोरगावबाजार, चामोर्शी, गोवर्धा, देवाडा, कोरची, भामरागड, एटापल्ली, धानोरा येथे इयत्ता 6 वी वर्गात नविन प्रवेश व इयत्ता 7 वी ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरणेकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. इयत्ता 6 वी ते इयत्ता 9 वी प्रथम सत्राकरीता इच्छुक विदयार्थ्यानी अर्ज करावे.

         आवेदनात वार्षिक परीक्षेच्या गुणांच्या आधारे एकुण प्राप्त गुणांची परिपुर्ण माहिती भरणे आवश्यक आहे. कोणत्याही स्थितीत श्रेणी पध्दती स्वीकृत केली जाणार नाही याची नोंद घ्यावी. शैक्षणिक वर्ष 2023-24 या सत्रातील प्रथम सत्राच्या एकूण गुणांची गुणपत्रिका जोडून सर्व विद्यार्थ्यांनी/पालकांनी तसेच मुख्याधपक यांनी दिनांक 30/01/2024 पुर्वी परिपुर्णआवेदन अर्ज भरणे आवश्यक आहे. दिनांक 30/01/2024 नंतर प्राप्त आवेदन अर्ज विचारात घेतले जाणार नाही. याची स्पष्ट या एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल मधील प्रवेशासाठी

         विद्यार्थी अनुसूचित जमातीचा (आदिवासी) असावा. सक्षम अधिकारी यांचेकडून प्राप्त अर्जाचा दाखला जोडावा. (उपविभागीय अधिकारी महसूल) सन 2022-23 या वर्षात पालकाचे सरासरी एकत्रित उत्पन्न 6,00,000/-(सहा लक्ष) रू चे आत असावी. (आवेदन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जात प्रमाणपत्रासह पालकांच्या वार्षिक उत्पनाचा दाखला जोडण्यात यावा.)

         प्रवेश अर्जासोबत बोनाफॅाईड सट्रीफिकेट जोडने आवश्यक आहे. (सत्र 2023-24), प्रवेश घेण्यापुर्वी पालकांना या कार्यालयात प्रवेशाबाबतचे संमती लिहुन द्यावे लागेल.विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जोडण्यात यावे.पालकांचा रहिवासी दाखला, दारिद्रय रेषेखाली असल्यास तसा दाखला, विधवा असल्यास तसा दाखला सोबत जोडावा.

          प्रकल्प अधिकारी, एकात्किमक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती भंडारा, तुमसर, मोहाडी, पवनी, लांखादुर, लाखनी, साकोली मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा, खापा अनुदानित आश्रमशाळा माडगी, आमगाव (आ.), कोका (जं), येरली, चांदपूर, पवनारखारी या ठिकाणी प्रवेश अर्ज निशुल्क उपलब्ध आहेत. अधिक माहिती करिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भंडारा जि. भंडारा यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी नीरज मोरे यांनी केले आहे.