ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 17 ऑगस्टपासून आयोजन बेरोजगार युवक – युवतींनी लाभ घ्यावा

ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 17 ऑगस्टपासून आयोजन बेरोजगार युवक – युवतींनी लाभ घ्यावा

भंडारा, दि. 13 : महाराष्ट्र शासनाच्या धोरणा नुसार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, भंडारा यांच्या मार्फत ऑनलाईन पध्दतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 17 ते 20 ऑगस्टपर्यंत करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने नामांकित कंपन्या आणि नियोक्तांनी रिक्त पदांची नोंद कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Online job fair Bhandara -4 येथे घेवुन आपल्या आवश्यकते नुसार बेरोजगार उमेदवारांची उपलब्ध असलेली यादी ऑनलाईन पध्दतीने प्राप्त करावी. रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयाचे ऑनलाईन नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे.

तसेच नोकरीसाठी इच्छुक उमेदवांरानी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर पंडीत दिनदयाळ अपाध्याय रोजगार मेळावा Online job fair Bhandara -4 येथे ऑनलाईन अप्लाय करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वतीने करण्यात येत आहे. अधिक माहीतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्याशी 07184-252250 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.