आजपासून बचतगटांचे प्रदर्शन दिवाळी निम्मित फराळ व अन्य उत्पादने विक्रीला

आजपासून बचतगटांचे प्रदर्शन दिवाळी निम्मित फराळ व अन्य उत्पादने विक्रीला

           भंडारा,दि. 7: महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फतनवतेजस्विनी- महाराष्ट्र ग्रामिण महिला उद्योजकता विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे.  जिल्हयातील ग्रामीण व शहरी भागातील महिला बचत गट उत्पादित, निर्मित विविध प्रोडक्टस्, खादय पदार्थ, दिवाळी फराळ, कोसा साडी काथा वर्क, लेडीज बँग व  शोभेच्या वस्तु इत्यादींचे प्रदर्शन व विक्रीचे  आजपासून 9 नोव्हेंबरपर्यंत या तीन दिवसीय“दिवाळी मेळावा”जिल्हास्तरीय प्रदर्शनीचे  आयोजन करण्यात आले आहे.

            प्रदर्शनी गुजराती समाज वाडी, जलाराम चौक,वरठी रोड, भंडारा येथे

 7 ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान

व सकाळी 11.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत सुरू राहील.तरी भंडारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देऊन अवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी माविम भंडारा यांनी कळविले आहे.