आरसेटीचे 45 दिवसीय कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचे प्रशिक्षण

आरसेटीचे 45 दिवसीय कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचे प्रशिक्षण

 

भंडारा, दि. 27 : भारत सरकार, महाराष्ट्र शासन व बँक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयरोजगार प्रशिक्षण संस्था, भंडारा यांचे मार्फत निशुल्क कॉम्पुटर हार्डवेअर आणि नेटवर्किंगचे 45 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम 2 मे 2023 पासून सुरु होत आहे.

प्रशिक्षणामध्ये मूलभूत विद्युत सुरक्षा, इलेक्ट्रोनिक (एनालॉग व डिजिटल) बेसिक इलेक्ट्रॉनिक Resistor, Capacitor, Diodes & their functions, Block Diagram of computer, Classification of computer, Characteristics of Computers Bits, Bytes, KB, MB, GB,TB, PB, EB, ZB, YB, सुरु होत Brontope byte, Geeope Byte, Computer Software, Computer Hardware Tools and equipments required for computer servicing and its handling, etc, कर्जे विषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायाची संधी, बाजार सर्वेक्षण, बँकेच्या योजना याबद्दल मार्गदर्शन दिले जाईल. प्रशिक्षण प्रवेशाकरीता आयोजित मुलाखतीसाठी येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधार कार्ड, मनरेगा कार्ड, सोबत आणणे आवश्यक आहे.

 

प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवन, चहा, नाश्ता, राहणे आदींची सोय मोफत केली जाईल. स्वयरोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी असणारे वय 18 ते 45 वर्ष, शिक्षण दहावी पास किंवा नापास अशा बेरोजगार पुरुष, महिलांनी मुलाखतीकरीता 2 मे रोजी सकाळी 10 वाजता बि. ओ. आई. स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, लालबहादुर शास्त्री (मनरो) शाळेच्या बाजूला, शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे निर्देशक मिलींद इंगळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9511875908, 8669028433,9766522984 व 8421474839 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.