अंबाडी, नेरला व पहेला येथील विशेष मतदार नोंदणी

अंबाडी, नेरला व पहेला येथील विशेष मतदार नोंदणी

 शिबिरांना जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटी

नवमतदारांची नोंदणी करावी-जिल्हाधिकारी

          भंडारा,दि.4 : भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार भंडारा जिल्हयामध्ये मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमा अंतर्गत दि. 27 ऑक्टोबर 2023 ते 9 डिसेबर 2023 या कालावधीमध्ये नागरिकांकडून दावे व हरकती मतदार यादीत नाव नोंदणी, वगळणे स्थानांतरबाबत व दुरुस्ती बाबत फार्म 6,7,8, या विहित नमुनेत  अर्ज मागविण्यात येत आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर विशेष मतदान नोंदणी शिबिरे सुरू आहेत. यामध्ये आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व उपविभागीय अधिकारी भंडारा, गजेंद्र बालपांडे यांनी अंबाडी, नेरला व पहेला येथील मतदान केंद्रावर जाऊन बीएलओंच्या कामाची पाहणी केली.

यावेळी आयोगाचे निर्देशानुसार नव मतदार तसेच मयत, स्थलांतरित व दुबार नाव असलेले तसेच नाव वगळण्यासाठी आलेले अर्जांची निकषानुसार छाननी करून तशा पद्धतीच्या नोंदी अद्यावत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक नागरिकांनी त्यांची मतदार नोंदणी करुन घेण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याचे आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम 2024 अंतर्गत मा.मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार आज 4 नोव्हेबर 2023 शनिवार दि.5 नोव्हेंबर,2023 रविवार,दि.25 नोव्हेंबर,2023 शनिवार आणि व दि.26 नोव्हेबर,2023 रविवार हया चार दिवशी मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे.

          तरी मतदान केंद्रावर मतदान केंद्र स्तरीय अधिकारी उपस्थित राहुन मतदाराचे अर्ज स्विकारतील. तरी सर्व नागरिकांनी मतदार नोंदणी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, तसेच 26 डिसेबर,2023 पर्यत पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत समक्ष सहा.मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, मतदार नोंदणी अधिकारी, कार्यालय, किंवा nvsp.in संकेत स्थळावर किंवा voterhelpline app या mobil  app द्वारे नोंदणी करता येईल.

          तसेच नवीन मतदार नोंदणी करतांना रहिवासी व जन्म तारिख पुरावा जोडणे आवश्यक आहे. तरी भंडारा जिल्हयातील सर्व मतदारांनी विशेषत: ज्यांची 1 जानेवारी, 2024 पर्यत 18 वर्ष पुर्ण होत आहेत. त्या नव मतदारांनी आपली मतदार नोंदणी करुन लोकशाही बळकटीकरणासाठी जागृत मतदार म्हणून आपला हातभार लावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी योगेश कुंभेजकर, यांनी कळविले आहे.