पितळी भांड्यांच्या क्लस्टर विषयी जिल्हाधिकाऱ्यांची उद्योजक पंकज सारडा यांच्याशी चर्च

पितळी भांड्यांच्या क्लस्टर विषयी जिल्हाधिकाऱ्यांची उद्योजक पंकज सारडा यांच्याशी चर्च

भंडारा,दि.4 : भंडारा जिल्ह्यात परंपरेने चालत आलेल्या पितळी भांड्यांच्या निर्मिती व उद्योगाविषयी आज जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी श्री. मेटल्सच्या मुजबी व बेला येथील युनिटला भेट दिली. उद्योजक  पंकज सारडा यांच्याशी या व्यवसायाबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे ,जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ व ऋषी सारडा प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री. मेटल्समधून जगातील ६० देशांमध्ये साधारण   पितळेची भांडी याचे उत्पादन पाठवण्यात येते .पारंपारिक चालत आलेला हा व्यवसाय जतन करण्यासाठी यामध्ये काळानुरूप बदल करणे गरजेचे असल्याचे मत श्री.सारडा यांनी यावेळी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या वतीने उद्योगस्नेही धोरण राबविण्यात येत असून स्थानिक उद्योजकांनी तसेच तरुण व्यावसायिकानी पितळी भांड्यांच्या व्यवसायात यावे, यांनी मोठ्या प्रमाणावर रोजगार देखील उपलब्ध करता येतो आणि भंडारा जिल्ह्याची प्राचीन भौगोलिक देखील कायम राहील,असे श्री.सारडा म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी पितळी भांड्यांच्या कारखान्याची पाहणी करून माहिती घेतली आणि विस्तृत चर्चा केली.

कारखान्यात कार्यरत मनुष्यबळाची माहिती व पितळी भांड्यांच्या निर्मिती प्रक्रियेची सर्व सखोल पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तसेच पाळीव पशु-पक्ष्यांसाठी पोषक खाद्य निर्मितीच्या व्यवसायाबद्दलची माहिती देखील त्यांनी दिली. हे पोषक पशु खाद्य तयार करताना प्रकल्प संचालक आत्मा यांनी देखील त्यांना लागणारे  कच्चा माल जिल्ह्यात कार्यरत शेतकरी उत्पादक कंपन्यांशी समन्वय साधून उपलब्ध करून देण्याविषयीच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आत्मा( कृषी) वर्षा चिखले यांना दिल्यात.