30 नोव्हेंबरपर्यंत धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन

30 नोव्हेंबरपर्यंत धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 30 : पणन हंगाम 2023-24 खरीप मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर दि. 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत धान खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू झालेली आहे.

शेतकरी नोंदणी करताना हंगाम 2023-24 पासून ज्या शेतकऱ्यांचा 7/12 आहे, त्याच शेतकऱ्याचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे, त्याशिवाय नोंदणी पूर्ण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्याच शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वतः खरेदी केंद्रावर उपस्थित राहून दिलेल्या कालावधीत म्हणजेच, दि. 30 नोव्हेंबरपर्यंत खरेदी केंद्रावर मुदतीत धान खरेदीसाठी नोंदणी पूर्ण करावी, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी संजय हजारे यांनी कळविले आहे.

ही आहेत खरेदी केंद्र :

मुल तालुक्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती मुल, सावली तालुक्यातील सेवा सहकारी संस्था मर्या. पाथरी, श्री. किसान सह.तांदुळ गिरणी मर्या.व्याहाड (बु.), सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव विविध कार्य.सह. संस्था, नवरगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती सिंदेवाही, सेवा सहकारी संस्था रत्नापूर, विविध कार्य.सह. संस्था सिंदेवाही, सिंदेवाही तालुक्यातंर्गत नवरगाव सहकारी राईस मिल, नवरगाव आणि सिंदेवाही सहकारी भात गिरणी, सिंदेवाही,  नागभिड तालुक्यातील तालुका शेतकी खरेदी विक्री सह.संस्था नागभिड, कृषि उत्पन्न बाजार समिती नागभिड  आणि श्री. गुरुदेव सहकारी राईस मिल कोर्धा ता. नागभीड, चिमूर तालुक्यातील  चंद्रपूर जिल्हा कृषि औद्यो. सहकारी संस्था, चिमूर आणि चिमूर तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री नेरी ता. चिमूर, गोंडपिपरी तालुक्यातील कोरपना ता.ख.वि.समिती गोंडपिपरी, ब्रम्हपुरी तालुक्यातील चंद्रपूर जिल्हा कृषि औद्योगिक सह. संस्था, ब्रम्हपुरी खंड सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था, चंद्रपूर जिल्हा कृषि औद्यो. सहकारी संस्था बरडकिन्ही आणि प्रगत शेतकरी शेती उपज व विक्री सहकारी संस्था कळमगाव, कृषि उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा, कृषि उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर, बल्लारपूर तालुक्यातील कोरपना ता.ख.वि.समिती कोठारी ही खरेदी केंद्र आहेत.