चोरी करणा-या महिला आरोपीस विविध कलमान्वये ७ वर्ष सश्रम कारावास व 3,000/- रु. द्रव्यदंडाची शिक्षा

चोरी करणा-या महिला आरोपीस विविध कलमान्वये ७ वर्ष सश्रम कारावास व 3,000/- रु. द्रव्यदंडाची शिक्षा

• गडचिरोली येथील मा. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी श्री. आर. आर. खामतकर

सा. यांचा न्यायनिर्णय

दिनांक ०४/०३/२०२३ रोजी यातील फिर्यादी नामे ताराबाई महादेव पेंदाम, रा. साखरा यांनी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिली की, यातील फिर्यादीची नातीन दिनांक २९/११/२०२२ रोजी कोर्टात सोडचिट्टी तारखेवर आले असता, यातील आरोपी महिला ही सुध्दा मी कोर्टात सोडचिट्टी करीता आली आहे. असे सांगुन फिर्यादीचे नाती सोबत मैत्री करुन फिर्यादीचे घरी जाणे-येणे करुन दिनांक २५/०३ /२०२३ रोजी सकाळी १० ते ११ वा. दरम्यान फिर्यादीचे घरातील पानाळ्यावरील टिनाची पेटी उतरवुन टिनाचे पेटीत ठेवलेले सोन्याचे दागीने व नगदी रोख रक्कम असे एकुण ६१,०००/- रु. किंमतीचा माल चोरुन घेवुन गेली. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन नमुद गुन्हयातील आरोपी नामे यश्वदा ऊर्फ नंदिनी नाजुकराव उसेंडी, रा. काकडयेली, ता. धानोरा, जि. गडचिरोली हिचे विरुध्द कलम ३८०, ४५७ भा. द. वी. अन्वये सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर भेंडारे यांनी पोस्टे गडचिरोली येथे आरोपी विरुध्द अप क्र. १७१ / २०२३ अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. गुन्ह्याचा तपास पोहवा / १४४५ गंगाधर जुवारे यांनी मा. पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम सा. यांचे मार्गदर्शनाखाली करुन आरोपी विरुध्द भरपुर व सबळ पुरावा मिळुन आल्याने दोषारोपपत्र दाखल केले असता, आर. सी. सी. नं. ६४ / २०२३ नुसार मा. श्री. आर. आर. खामतकर सा. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात खटला चालवुन विशेष सहायक सरकारी अभियोक्ता यांचे युक्तीवाद ग्राह्य धरुन आज दि. १६/०८/२०२३ रोजी श्री. आर. आर. खामतकर सा. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयाने आरोपी नामे यश्वदा ऊर्फ नंदिनी नाजुकराव उसेंडी हिस दोषी करुन कलम ३८० भा. द. वी. अन्वये २ वर्ष सश्रम कारावास व १,०००/- रु. दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, कलम ४१९ भा. द. वी. अन्वये ३ वर्ष सश्रम कारावास व १,०००/- रु. दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, कलम ४५४ भा. द. वी. अन्वये २ वर्ष सश्रम कारावास व १,०००/- रु. दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली.

सरकार तर्फे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता श्री. बि. के. खोब्रागडे, कोर्ट पैरवी पोहवा / २२२७ दिनकर मेश्राम, क्राईम पोहवा / १४७२ श्रीराम करकाडे, कोर्ट पैरवी मोहरर पोअं / ३३९१ हेमराज बोधनकर, व मपोअं / ३३९३ सोनिया दुर्गे यांनी आरोपीस शिक्षा होणेस कामकाज पाहिले व सहकार्य केले.