डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात राज्यस्तरीय भव्य कृषि प्रदर्शनीचे आयोजन….

डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात राज्यस्तरीय भव्य कृषि प्रदर्शनीचे आयोजन….

कृषि प्रदर्शनीचा लाभ घ्यावा डॉ.डि.बी. उंदिरवाडे

डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२४ व्या जयंती दिनानिमीत्य दि. २७ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान विद्यापीठ क्रिडांगण डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे राज्यस्तरीय भव्य कृषि प्रदर्शनी आयोजन पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे. या प्रदर्शनीमध्ये फळबाग, भाजीपाला फुलशेती वनौषधी, कापुस, ज्वारी, गहू, कडधान्य तेलबिया पाणलोट विकास स पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कृषि अभियांत्रीकी इत्यादी विभागाची दालने तसेच ईतर राजसंस्थासह कृषि निविष्ठा कृषि औजारे यांची दालने सुधा राहणार आहे. दि. २७ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान दररोज दुपारी २ वाजता सार शेतकरी सुख्याय प्रगतशिल शेतक-यांचे मनोगत व मान्यवरांच्या संबोधनाचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रदर्शनीतील कृषि पुरक व्यवसाय दालने तथा कृषि प्रक्रिया उद्योगातील दालने प्रदर्शनीस भेट देणा-या शेतक-यासाठी प्रेरणादाई तसेच शेतक-याचे मनोबल उंचावण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहेत. ही दालने या कृषि प्रदर्शनीतील मुख्य आकर्षण आहे.

याशिवाय गटशेती करार शेती स्वयंसहाय्यता बचत गटाच्या यशोगाथा, महिला बचत गटांनी उत्पादीत केलेले कृषि आधारीत उत्पादन शेतक-यांनी तयार केलेली नाविन्यपुर्ण शेती अवजारे इत्यादीची अभिनय दालने सुदधा उपलब्ध राहणार आहेत एकंदरीत या प्रदर्शनीत 400 जवळपास दालन उपलब्ध राहणार असुन ही प्रदर्शनी राज्यातील शेतक-यांसाठी एक पर्वनी ठरणार आहे. सर्व शेतकरी बंधू भगिनी कृषि निगडीत मंडळीनी या कृषि प्रदर्शनीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.डि.बी. उंदिरवाडे, मा. संचालक विस्तार शिक्षण, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला यांनी केले आहे तरी चंद्रपुर जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकरी बंधु आप भी सहभाग नोंदवावा अशी विनंती डॉ. व्ही. जी. नागदेवते, वरीष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, सिंदेवाही, जि. चंद्रपुर यांनी केली आहे.