बेरोजगारांचे आयुष्याच्या भाकरीसाठीचे आंदोलन

बेरोजगारांचे आयुष्याच्या भाकरीसाठीचे आंदोलन

राजुरा- संविधान चौक, राजुरा येथे बेरोजगारांचे आयुष्याच्या भाकरीसाठीचे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य सरकारने 4, 18 व 22 सप्टेंबर 2023 ला एकाच महिन्यात वेगवेगळे शासन निर्णय काढून युवकांचे स्वप्न भंग करण्याचा सपाटा लावला आहे. ज्यात नोकऱ्यांचे खाजगिकरण, शाळा दत्तक देणे, खासगी क़पन्यांना मान्यता देणे याचा समावेश आहे. 3 महिन्यासाठी खासगी तहसीलदार, अग्निवीर 4 वर्षासाठी व 11 महिन्यासाठी पोलिस शिपाई नियुक्ती करीत आहे. स्थायी नोकरी समाप्त करुन कंत्राटी तत्वावर फिक्स टर्म एम्प्लायमेंट देऊन युवकांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम शासन करित आहे.
याविरोधात हे आंदोलन उभारण्यात आले. जर स्थायी नोकरी नसेल, शिक्षण नसेल तर युवकांना चाय, समोसे, फळे, चिवड़ा विकन्यावाचून पर्याय नाही. म्हणून आम्ही युवकांना प्रतिकात्मक दुकान लावून दिले. या एकदिवसीय आंदोलनात युवकांचा सरकार विरोधात आक्रोश दिसत होता. ते पोटतिड़किने या विरोधात घोषणाबाजी करित होते.
तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन देऊन हे आंदोलन तात्पुरते समाप्त करण्यात आले. जर महारष्ट्र सरकार शासन निर्णय मागे घेत नसेल तर यापुढे उग्र आंदोलन उभारन्याचा इशारा देण्यात आला.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी दिनेश पारखी, धीरज मेश्राम, अमोल राऊत, संतोष कुळमेथे, मारोती कुरवटकर, रवि झाडे, लक्ष्मण तुराणकर, जगदीश पिंगे, संजय चिड़े, मधुकर कोटनाके, रमेश आड़े, मेघराज ऊपरे, रामचंद्र रासेकर, बंडु कावळे, आसिफ सय्यद, बलवंत ठाकरे, सौरभ मादसवार, संभाजी साळवे, विजय मोरे, बळिराज धोटे, भूषण फुसे, केशव ठाकरे, नंदुभाऊ वाढ़ई, रेशमा चौहान, ज्योती नळे, अभिलाष परचाके, योगेश आपटे, राजकिरण तोगरे, प्रकाश घुले, नितेश चांदेकर यांनी योगदान दिले.