अंमली व मादक पदार्थांची विक्री करणाऱ्याची माहिती  पद्धतीने पोलिसांना द्यावी-जिल्हाधिकारी गांजा विक्री करणाऱ्या  चार आरोपींना अटक

अंमली व मादक पदार्थांची विक्री करणाऱ्याची माहिती  पद्धतीने पोलिसांना द्यावी-जिल्हाधिकारी गांजा विक्री करणाऱ्या  चार आरोपींना अटक

           भंडारा,दि.30:  अमली  व मादक पदार्थ  विक्री   प्रतिबंधासाठी प्रशासन  पावले उचलत असून असे पदार्थ  बाळगणाऱ्या व  विक्री  तसेच सेवन करणाऱ्या असामाजिक तत्वांची माहिती  नागरिकांनी पोलिस व प्रशासनाला द्यावी .माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवल्या जाईल, तरी व्यसनमुक्त समाजासाठी सुजाण नागरिक म्हणून पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी संयुक्तपणे केले.

जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती व जिल्हास्तरीय  नार्को कोऑडीनेशन  समितीच्या बैठकीत  ते बोलत होते .  या बैठकीला  जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी,उपस्थित होते  .या बैठकीत पोलिस विभागाने  अमली पदा्थविरोधी केलेल्या कारवाईच्या  अहवालाचे सादरीकरण  करण्यात आले .

        जिल्हयात अस्तित्व नशामुक्ती केंद्र,खात रोड, संकल्प व्यसनमुक्ती केद्र,टाकळी, इंन्ट्रग्रेटेड रिहॅबिलीटेशन सेंटर फार ॲडीक्ट बेला, भंडारा नशामुक्ती केंद्र,ठाणा अशी चार व्यसनमुक्त केंद्र आहेत.या केंद्रात व्यसनमुक्तीसाठी संबंधित व्यक्तींना दाखल  करण्यात येते . जुलै 2023 अखेर गांजा   सेवन करणाऱ्याविरुध्द एकुण 15 गुन्हे नोंद करण्यात आले असून ,गांजा हा अंमली पदार्थ विक्रीकरिता वाहतुक करणाऱ्यावर 2 गुन्हे नोंद करण्यात आल्याचे व यामध्ये 4 आरोपीना अटक केल्याची माहिती  पोलिस विभागाने दिली.

         अंमली पदार्थ विरोधात जनजागृती वाढविण्यासाठी आवश्यक असणारे पोस्टर्स,बॅनर्स तयार करावे,अंमली पदार्थाचे सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबाबत सामान्य लोकापर्यत जनजागृती करण्याचे निर्देश   जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आले .

        NCORD पोर्टलवर झालेल्या बैठकीचा कार्यवृतात व पुर्तता अहवाल अपलोड करुन पोर्टल अद्यावत करणे तसेच NDPS  कायद्याबाबत जास्तीत जास्त प्रमाणात प्रशिक्षणचे आयोजन करणे,तसेच NCORD  पोर्टलबाबत माहिती तयार करण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी   दिल्यात.

         जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणारे,पिणारे ईसम याच्याबाबत गोपिनय माहिती काढून जिल्हयात सक्रिय असे ईसमावर लक्ष ठेवून खात्रीलायक माहिती प्राप्त होताच एन.डी.पी.एस.कायद्यान्वये कारवाई करावी, असे निर्देश श्री.  मतानी  यांनी अधिनस्त पोलिस अधिकाऱ्यांना दिले .

         तसेच जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी समिती व जिल्हास्तरीय नार्को को- ऑडीनेशन सेंटर समितीच्या सदस्यांनी यापुढे एकत्र बैठक आयोजित करण्याचे निर्देश ही देण्यात आले  .