जेम पोर्टल’ विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

जेम पोर्टल’ विषयावरील प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

           भंडारा, दि. 10 : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय धोरणानुसार विविध शासकीय कार्यालयांना करावयाच्या खरेदी प्रक्रियेत सहाय्यभूत होणारे गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) हे पोर्टल विकसित केले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके यांच्या हस्ते करण्यात आले.

          गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलव्दारे होणारी सर्व कार्यपध्दती ही कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय असून ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. या पोर्टलच्या वापरामुळे शासकीय विभागाव्दारे होणा-या खरेदी प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येणार असल्याचे श्रीमती  फलके यांनी मार्गदर्शनात सांगितले.राज्य शासनाने राज्यातील सर्व शासकीय विभाग, संस्थांकडून वस्तु व सेवेच्या खरेदीसाठी या पोर्टलचा वापर करण्याविषयी निर्देशित केले आहे. त्यानुसार ऑनलाईन खरेदी पद्धत, वेबसाईट, नोंदणी, तांत्रिक अडचणी आदींविषयी या कार्यशाळेत शैलेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.

         जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक हेमंत बदर, जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील भांडार खरेदी हाताळणारे अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित होते.  प्रास्ताविक हेमंत बदर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक श्री. गाडेकर यांनी तर आभार महाव्यवस्थापक श्री. बदर यांनी मानले.