दहा हजारावर अधिक विद्यार्थी, नागरिकांची मल्टीमीडिया प्रदर्शनीला भेट

दहा हजारावर अधिक विद्यार्थी, नागरिकांची मल्टीमीडिया प्रदर्शनीला भेट

दोनशेहून अधिक नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

भंडारा दि. 28 : केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय कार्यालय नागपूर व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बस स्टँड परिसरातील तीन दिवसीय मल्टीमीडिया प्रदर्शनीचा आज थाटात समारोप झाला. गेल्या तीन दिवसात या प्रदर्शनीला दहा हजाराहून अधिक नागरिकांनी भेट देऊन पाहणी केली.

समग्र शिक्षा अभियानाच्या स्टॉलवर एकूण तीन हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावून विशेष तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्षमता चाचणी आणि अन्य साधनाची माहिती जाणून घेतली.

प्रदर्शनीला सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. स्वच्छ भारत मिशन आणि मेरी माटी, मेरा देश ह्या दोन कार्यक्रमासह केंद्र व राज्य शासनाच्या विविध विकासकामे,व योजना  आकर्षक पद्धतीने यात मांडलेल्या होत्या.  प्रदर्शनीमध्ये असलेले सेल्फी पॉईंट विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी आकर्षणाचे बिंदू ठरले. तर उमेदच्या बचत गटांनी केलेल्या केलेल्या विविध पाककृतींचा आस्वाद देखील उपस्थित नागरिकांनी यावेळी घेतला.

 आज दुपारच्या सत्रामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर  रणदिवे व जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ  दांदले तसेच एसटीचे अधिकारी यतीश कात्रे तसेच कामगार अधिकारी पराग शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोपिय कार्यक्रम संपन्न झाला. या समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये प्रदर्शनीच्या आयोजनामाची भूमिका क्षेत्रीय सूचना अधिकारी सौरभ खेकडे यांनी मांडली तसेच प्रदर्शनीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा  सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने प्रदर्शनीचे आयोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. क्षेत्रीय प्रसारण कार्यालयाचे श्री. तिवारी यांच्यासह त्यांच्या अधिनस्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.