राखीव जागेवर निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करावा

राखीव जागेवर निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांनी जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करावा

 

           भंडारा,दि.10 : भंडारा तालुक्यातील माहे जानेवारी,2023 ते डिसेबर,2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या बेरोडी पु.अर्जुनी पु.जामगाव-वळद पु.रावणवाडी या ग्रामपंचायतीमधील सर्व नागरीकांना सुचित करण्यात येते की, सदर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक पोट निवडणुकीसाठी मा.राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांचे दिनांक 3 ऑक्टोबर,2023 चे निवडणुक कार्यक्रमानुसार दिनांक 16 ऑक्टोबर,2023 ते दिनांक 20 ऑक्टोबर, 2023 या  कालावधीत  नामनिर्देशनपत्रे  स्विकारण्यात येणार आहेत.

         तसेच संबधित ग्रामपंचायतीमधील ज्या कोणत्याही उमेदवारास नागरीकांस अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व नागरीकांच्या मागासप्रवर्गाकरिता राखून ठेवलेल्या जागेवर निवडणूक लढवावयाची आहे.अशा उमेदवार /नागरीकांनी आपले जात प्रमाणपत्र पडताळणीबाबतचे अर्ज ऑनलाईन भरुन ऑनलाईन भरलेला अर्ज आवश्यक दस्तऐवजासह( कागदपत्रे/ पुरावे) तहसिल कार्यालय,भंडारा येथील निवडणूक शाखेत संपर्क साधावा,असे आवाहन तहसिलदार विनीता  लांजेवार यांनी कळविले आहे.