शासनाच्या विविध योजनांचा महाडीबीटीद्वारे लाभ घ्या Ø 15 ते 25नोव्हेंबर दरम्यान अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम

शासनाच्या विविध योजनांचा महाडीबीटीद्वारे लाभ घ्या Ø 15 ते 25नोव्हेंबर दरम्यान अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम

 

चंद्रपूर, दि. 17 : कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विविध वैयक्तीक लाभाच्या योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी 15 ते 25 नोव्हेंबर या पंधरवड्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत महाडीबीटी संकेतस्थळावर इच्छुकांनी अर्ज भरून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

 

प्रधानमंत्री कृषी सिंचाई सुक्ष्म सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत संरक्षीत शेती, कांदाचाळ उभारणी, शेततळे अस्तरीकरण, पु. अहिल्याबाई होळकर भाजीपाला रोपवाटीका आदी प्रमुख योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरावी. अधीक माहितीसाठी संबंधीत तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयास संपर्क करावा.

 

असा भरा अर्ज :

 

https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळास भेट द्या. शेतकरी योजना विभागावर क्लिक करा, नवीन अर्जदार नोंदणी करा, अर्जदाराचे लॉगिन करा, अर्जदाराची वैयक्तिक माहिती, पत्ता व प्रवर्ग भरा. शेतजमिनीचा तपशिल भरा, पिकाचा तपशिल भरा, बँकेचा तपशिल भरा, विविध योजनांची व बाबींची निवड करा, अर्ज यशस्वीरीत्या पोर्टलवर सादर करा.