आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा गडचिरोली जिल्हा दौरा

गडचिरोली, दि.03 : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार, दि.4 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 7 वा. शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. गुरुवार, दि. 05 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा.गडचिरोली येथून चामोर्शीकडे प्रयाण. सकाळी 8 वा.चामोर्शी येथे आगमन व ईएमआरएस शालेय संकुलाचे भुमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वा.चामोर्शी येथून भाडभिडी, ता. मुलचेराकडे प्रयाण. सकाळी 10.15 वा.भाडभिडी येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृहाचे भुमीपुजन. दुपारी 12.30 वा. मुलचेरा येथुन नागपूरकडे प्रयाण.