सिंदेवाही तालुक्यात विद्युत करंट लागून हत्तीचं मृत्यू

सिंदेवाही तालुक्यात विद्युत करंट लागून हत्तीचं मृत्यू

आज, दि. 03.10. 2023 रोजी चिटकी गावक-यांनी शेतात हत्ती मृत अवस्थेत असल्याची माहीती

श्री. एन. पी. राठोड, बिट वनरक्षक लोनखैरी यांना दिली. माहीत प्राप्त होताच क्षेत्र सहायक, सिंदेवाही यांनी

त्यांचे अधिनिस्त कर्मचारी व आर. आर. यु. सिंदेवाही वनकर्मचा-यांना घेवून मौकास्थळी पोहचले. सदर घटना

उपक्षेत्र सिंदेवाही, नियतक्षेत्र लोनखैरी कक्ष क्र. 247 आर.एफ. च्या सिमेवर असलेल्या शेतशिवार मध्ये असुन,

हत्ती

मृत्यू

अवस्थेत आढळुन आल्याबाबत खात्री करण्यात आली. सदर घटनेची माहीती वरिष्ठ अधिका-यांना

कळविण्यात आली. त्यानंतर घटनास्थळावर मा. डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक, चंद्रपुर वनवृत्त,

चंद्रपुर, मा. दिपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी, मा. एम. बी. चोपडे, सहायक

वनसंरक्षक (प्रादे. व वन्यजीव), ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी मा. श्री. हजारे, सहायक वनसंरक्षक, (तेंदू),

ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी, डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) TATR चंद्रपुर,

चंद्रपुर NTCA चे प्रतीनिधी श्री. बंडु धोत्रे, मानद वन्यजीव रक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) चे

प्रतिनिधी श्री. विवेक करंबेकर, डॉ. सुरपाम, पशुधन विकास अधिकारी, सिंदेवाही, डॉ. शालीनी लोंढे, पशुधन

विकास अधिकारी, सिंदेवाही यांचे उपस्थितीत हत्तीचे निरिक्षण करून हत्तीचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या

आघाताने झालेला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला. त्यानुसार, श्री. अशोक पांडुरंग बोरकर रा. चिटकी

यांचे घराची व सभोवतालच्या परिसराची झडती घेवून प्रकरणात श्री अशोक पांडुरंग बोरकर रा. चिटकी वय

65 वर्ष, व श्री. अजय अशोक बोरकर रा. चिटकी वय 29 वर्ष यांचे विरूध्द पी.ओ. आर. क्र. 09130/228231

अन्वये वनगुन्हा नोंदविण्यात आला. सदर आरोपींना चौकशी करीता ताब्यात घेण्यात आले असुन, आरोपीची

सखोल चौकशी सुरू आहे. पुढील चौकशी मा. श्री. एम. बी. चोपडे, सहायक वनसंरक्षक (प्रादे व वन्यजीव),

ब्रम्हपुरी वनविभाग, ब्रम्हपुरी हे करीत आहे.