29 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

29 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन

गडचिरोली, दि.27:शासन निर्णयान्वये दिनांक 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील राष्ट्रीय ग्राहक दिनाचा कार्यक्रम दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता तहसिल धानोरा येथील किसान भवन येथे जिल्हास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमामध्ये ग्राहक जनजागृती करण्याबाबत प्रदर्शन तसेच इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.