माहितीचा अधिकार हा प्रभावी अधिकार-  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

माहितीचा अधिकार हा प्रभावी अधिकार–  जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

  • माहिती अधिकार दिन साजरा

भंडारा, दि. 27 :सामान्य नागरिकांना योग्य ती  माहिती माहिती अधिकार कायद्यान्वये मिळत आहे, त्यामुळे  हा कायदा प्रभावी असल्याचे  मत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज व्यक्त केले. नियोजन भवन येथे माहिती अधिकार दिन आज साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते  नितीन  कारेमोरे  प्रामुख्याने  उपस्थित होते.

        श्री. कारेमोरे यांनी माहिती अधिकाराबद्दल विस्तृत माहिती दिली.  जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी करावयाची प्रक्रियेवर त्यांनी प्रकाश टाकला  माहितीच्या अधिकारामध्ये दोन महत्वाच्या बाबी आहेत. माहिती पुरविणे गोपनीय कारण देता येणार नाही,अपवाद कलम 8 तसेच माहिती विहीत मुदतीत पुरविणे. कार्यालयाचे कामकाजाबाबत अधिनियमांच्या कलम 4 प्रमाणे कार्यवाही करुन प्रवेशद्वाराजवळ माहिती अवलोकनार्थ ठेवावी. त्या माहितीचे सुचना फलक लावावे कलम 5 प्रमाणे कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात सहायक जनमाहिती अधिकारी, जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी यांचे शाखा कार्यासनाप्रमाणे ठळक अक्षरात माहिती लावावी,

          तसेच माहिती अधिकाराचा अर्ज कार्यालयात स्विकारतांना   सहायक माहिती अधिकारी  नियुक्त करावा, आपल्या कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागात ठळक दिसेल अशा दर्शनी भागात नियुक्त जन माहिती अधिकारी  नावे फलकावर लावावी,तसेच सर्व माहितीच्या अर्जाचा पत्रव्यवहार व माहिती पुरविणे हे जन माहिती अधिकारी यांनी स्वत: जनमाहिती अधिकारी म्हणून करावयाचे आहे.

          आपल्या कार्यालयाची कोणत्याही माहितीच्या अर्जातील माहितीच्या खर्चाकरिता पृष्ठ  रुपये 2/- प्रमाणे व पोष्टाचा खर्च सुरूवातीलाच संबंधिताना कळविणे, अतिरिक्त खर्चाचा भरणा करुन माहिती अधिकारी यांचेकडे पावती सादर केल्यानंतरच माहितीच्या छायांकित प्रती काढण्याची प्रक्रिया करावी,

        विचारलेली माहिती ही माहिती अधिकाऱ्यांशी संबंधित नसेल तर ती योग्य त्या संबंधित माहिती अधिकाऱ्याकडे किंवा सार्वजनिक प्राधिकरणाकडे 2 दिवसात हंस्तातरीत करावी,तसे अर्जदारास कळवावे,पत्र व्यवहार केल्यास पोस्टाचे पुराव्यासहीत  कार्यालयात ठेवावी. या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके, उप जिल्हाधिकारी श्रीपती मोरे, यांच्या सह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.