प्रारूप मतदान केंद्र यादीबाबत हरकती व सूचना आमंत्रित

प्रारूप मतदान केंद्र यादीबाबत हरकती व सूचना आमंत्रित

भंडारा, दि. 27 : जिल्हयातील 60, तुमसर, 61 भंडारा, 62 साकोली विधानसभा मतदार संघाचे मतदान केंद्र सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण करून प्रारूप मतदान केंद्र यादी दिनांक 21/9/2023 रोजी  जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे प्रसिध्द करण्यात आलेली असून  https://bhandara.gov.in  या संकेतस्थळावर देखील पाहण्यास उपलब्ध आहे.

तसेच 62 साकोली विधानसभा मतदारसंघाची वरील मतदान केंद्र सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण करून प्रारूप मतदान केंद्राची यादी दिनांक 21.9.2023 रोजी तहसिल कार्यालय साकोली, लाखनी व लाखांदूर येथे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करून  तपासणी करीता ठेवण्यात आलेली आहे.  सदर यादी संदर्भात हरकती व सूचना दिनांक 29/9/2023 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा (निवडणूक शाखा) या ठिकाणी स्विकारण्यात येतील.  याची सर्व राजकीय पक्ष प्रमुख, प्रतिनिधी व नागरीकांना नोंद घ्यावी, असे  गौरव इंगोले,    मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी साकोली यांनी कळविले आहे.