जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छता सेवा मोहिम

जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छता सेवा मोहिम

         भंडारा, दि.3 – केंद्र शासनाच्या “आयुष्यमान भव” मोहिम अंतर्गत स्वच्छता ही सेवा जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे स्वच्छता ही सेवा मोहिम राबवुन श्रमदान करण्यात आले. कार्यक्रमात  स्वच्छता हि सेवा हे जागृकता करण्यासाठी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम यांचा मार्गदर्शानाखाली डॉ. अतुल देशमुख  अतिजिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. अमित पुटे निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. बा डॉ. नाईक, अधिपरिचारीका श्रीमती फुले, आहारतज्ञ श्रीमती पांडे, मुकदम मंगला ठोबरे, मनोज सोनेकर, गणेश निखाडे, विलास चोपकर,महेश पांडे, संजय हाटे व इतर नर्सिंग विद्यार्थीनी व कर्मचारी यासोबत अखिल भारतीय सफाई मजदुर काँग्रेस स्वतंत्र कामगार युनियनचे शहर अध्यक्ष हरिराम पांडेकर, शहर उपाध्यक्ष श्री.सोनेकर, संदिप शेंडरे , रवि सोनटक्के, मनिष मिळवे, अनुप शेदरे व निसर्ग विकास बहुदेशिय संस्थाचे अध्यक्ष व संस्थापक विनोद बट्टी व त्यांचे सहकारी  मनोज इळपाते,आशिष महावी, उमेश बेरकडे गुरु सिरयाग थी. शिशुपाल भूरे  गणेश नंदनवार, राजेश कोडापे  प्रशात मस्के, संजयजी एकापुरे यांचे कामगारांसोबत थी. एकापुरे यांनी साफ सफाई झाल्यानंतर कचरा जमा करण्याकरीता वाहनाची व्यवस्था करुन श्रमदान कार्यक्रमास रुग्णालयीन स्वच्छतेस मोलाचे सहकार्य केले. तसेच रुग्णालयातील  अतसरी व राऊत  जी. के. हटवार मारोती लांजेवार, लाडे तसेच लोले श्रीमती सोनवाने  पुष्पा पिसे सुरक्षा रक्षक ( मेस्को) यांचे सुध्दा विशेष सहकार्य लाभले.