ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर

ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर

 

भंडारा, दि. 1 : साकोली तालुक्यातील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारीक पध्दतीने राबविण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार साकोली तालुक्यातील उसगांव प्रभाग क्र.3 (सर्वसाधारण), उकारा प्रभाग क्र.2 (सर्वसाधारण स्त्री), खांबा प्रभाग क्र.2 (अनु.जमाती स्त्री), बरडकिन्ही प्रभाग क्र.2 (अनु.जमाती स्त्री) या ग्रामपंचायतीच्या रिक्त पदांच्या पोट निवडणूकांसाठी शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या व सुचना संबंधित ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालय, पंचायत समिती व तहसिल कार्यालय येथील सुचना फलकावर सर्व नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रसिध्द करण्यात आल्या आहे.

 

प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग निहाय मतदार यादीवर कोणत्याही नागरिकांचा आक्षेप, हरकती व सुचना असल्यास त्या आक्षेप, हरकती व सुचना तहसिल कार्यालय साकोली येथील निवडणुक विभागात गुरूवार दिनांक 2 मार्च 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. त्यानंतर आलेल्या आक्षेप, हरकती व सुचनांचा विचार केला जाणार नाही, असे निवडणुक अधिकारी (ग्रापनि) तथा तहसिलदार साकोली रमेश कुंभरे यांनी कळविले आहे.