जिल्ह्यात सर्व प्रकारची शस्त्रात्रे सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास बंदी

जिल्ह्यात सर्व प्रकारची शस्त्रात्रे सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास बंदी

 

भंडारा, दि. 1 : राज्य निवडणूक आयोग यांनी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम-2022 दिनांक 9 नोव्हेंबर रोजी जाहिर केला आहे. जिल्ह्यात आदर्श आचार सहिंतेची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडावा, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवू नये व निवडणूक प्रक्रिया आयोगाच्या निर्देशान्वये भंडारा जिल्ह्यात सर्व प्रकारची शस्त्रात्रे सार्वजनिक ठिकाणी बाळगण्यास बंदी घालण्यात येत आहे. सदर आदेश 28 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2022 रात्री 12 वाजता पर्यंत अंमलात राहील, असे आदेश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी निर्गमीत केलेले आहे.

 

शस्त्रास्त्र जमा करण्यासाठी छाननी समितीच्या बैठकीत चर्चा होवून गुन्हे दाखल असलेल्या 15 शस्त्र परवानाधारकांना नोटीस देवून शस्त्र तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावी. निवडणुकी दरम्यान ज्या शस्त्र परवाना धारकांवर गुन्हे दाखल होतील त्यांचे सुध्दा शस्त्र संबंधित क्षेत्राचे पोलीस स्टेशन अधिकारी यांनी तात्काळ जमा करावी. समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आल्यास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडचण निर्माण करत असल्याचे आढळून आल्यास व निवडणुका शांततेच्या मार्गाने पार पाडण्यास अडथळा निर्माण करण्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तींची शस्त्रास्त्रे अडकवून ठेवण्यास जिल्हा प्रशासनास कोणताही प्रतिबंध असणार नाही, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.