महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा- सिंदेवाही यांच्या विविध मागण्या चे निवेदन राज्य सरकारला पाठविण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा- सिंदेवाही यांच्या विविध मागण्या चे निवेदन राज्य सरकारला पाठविण्यात आले.

काल दिनांक 8 सप्टेंबर ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक तालुका शाखा- सिंदेवाही च्या वतीने गणेश जगदाळे तहसीलदार सिंदेवाही, प्राजक्ता भस्मे गटविकास अधिकारी सिंदेवाही, संजय पालवे गटशिक्षणाधिकारी सिंदेवाही यांच्या मार्फतीने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री व वर्षाताई गायकवाड शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले.
प्रमुख मागण्या-
 १) कोरोनाचे सर्व नियम पाळून प्राथमिक शाळा सुरू कराव्या. २) सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीत १ जानेवारी २००४ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या वेतन निश्चितीत होणारा अन्याय तात्काळ दूर करावा. ३) जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भातील बंद असलेली बी. डी. एस. प्रणाली तात्काळ सुरू करावी. ४) इयत्ता सहावी ते आठवी ला शिकविणाऱ्या सर्वच विषय शिक्षकांची (पदवीधर) वेतनश्रेणी १००% पदांना लागू करावी.
जिल्हाध्यक्ष मोरेश्वर गौरकार यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश टिपले यांनी निवेदन दिले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी नामदेव सुरपाम कार्यवाह, संजय मोहूर्ले उपाध्यक्ष, युवराज सोनवाने कोषाध्यक्ष उपस्थित होते