महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम-ब योजना लाभार्थी शेतकर्ऱ्यांनी अर्जातील त्रुटी पुर्तता करावी -महाऊर्जाचे आवाहन

महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम-ब योजना लाभार्थी शेतकर्ऱ्यांनी अर्जातील त्रुटी पुर्तता करावी -महाऊर्जाचे आवाहन

 भंडारा, दि.21 :महाकृषी ऊर्जा अभियान पी.एम. कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यात अद्याप पर्यंत एकूण 5662 अर्ज महाऊर्जाच्या ऑनलाईन कुसुम-ब पोर्टलवर प्राप्त झाले आहे. या अर्जांपैकी 832 लाभार्थी शेतकर्ऱ्यांनी सौर पंप योजनेचा लाभ घेतलेला आहे. एकूण नव्याने प्राप्त 4803 अर्जां पैकी 1234 लाभार्थी शेतक-र्यांच्या अर्जांमध्ये कागदपत्रांची त्रुटी आढळली असल्यामूळे त्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.

        या सर्व लाभार्थींना कुसुम पोर्टल वरुन एसएमएस त्यांच्या भ्रमणध्वनी वर पाठविण्यात आले आहे. भंडारा येथील महाऊर्जा जिल्हा कार्यालया मार्फत लाभार्थींच्या कागदपत्रांची त्रुटी पुर्तता करण्याकरीता भ्रमणध्वनी द्वारे संबंधितांना कळविण्यात आले आहे तरी अद्यापही बऱ्याच लाभार्थीं मार्फत त्रुटींची पुर्तता करण्यात आलेली नाही.

        त्रुटी अर्ज असलेल्या लाभार्थी शेतकर्ऱ्यांनी त्यांना मिळालेल्या युजरनेम व पासवर्ड चा उपयोग करुन ऑनलाईन पोर्टल वर आवश्यक त्रुटी असलेले कागदपत्रे अपलोड करुन त्रुटी पुर्तता करावी या करीता महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/benefshome या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच कागदपत्रे अपलोड होत नसल्यास किंवा कुठलीही अडचण संभावतास महाऊर्जा जिल्हा कार्यालय, भंडारास भेट द्यावी. जिल्हा मुख्यालय, भंडारा पत्ता :

          प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, विद्युत भवन, नागपूर रोड, भंडारा – 441904. दुरध्वनी : 07184-298955 E-mail: dobhandara@mahaurja.com जे लाभार्थी येत्या 07 दिवसांत त्रुटींची पुर्तता करणार नाही त्यांचे अर्ज निकाली काढण्यात येतील व मान्यता मिळाल्यास भविष्यात त्यांच्या अर्जाचा क्रम हा प्रथम त्रुटी पुर्तता करणार्ऱ्यास प्रथम प्राधान्य या अनुषंगाने गणला जाईल.