पीक नुकसानीच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांनी आधार क्रमांक बॅक ॲक्टीव्ह करावे,:जिल्हा प्रशासन

पीक नुकसानीच्या अनुदानासाठी लाभार्थ्यांनी आधार क्रमांक बॅक ॲक्टीव्ह करावे,:जिल्हा प्रशासन

          भंडारा, दि.21 : नैसर्गीक आपत्तीमुळे शेतपीकांचे व शेतजमीनीचे नुकसान झालेल्या पात्र शेतक-यांना मदतीचा निधी थेट लाभार्थ्याच्या आधार लिंक बॅक खात्यामध्ये जमा करण्यात येते.मात्र ब-याच शेतकरी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बॅक खात्याशी संलग्न नाहीत.

        तसेच ॲक्टीव्ह नसल्याने साधारण 10 ते 12 टक्के अर्ज संगणकीय प्रणालीव्दारे नाकारले जात आहेत.हे टाळण्यासाठी सर्व लाभार्थ्यानी त्यांचे आधार क्रमांक बॅक खात्याशी संलग्न करावे तसेच ॲक्टीव्ह करावे.निष्क्रीय आधार क्रमांक धारकांनी संबंधिकत आधार क्रमांक सक्रीय करून घेणे आवश्यक आहे.याकरीता लाभार्थ्यानी त्यांचा विशीष्ट क्रमांक त्यांच्या जवळच्या आपले सरकारच्या ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.