कृषीपंपाना दिवसा व रात्री सलग आठ तास चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा

कृषीपंपाना दिवसा व रात्री सलग आठ तास चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा

 भंडारा, दि.21: जिल्हयात महावितरणच्या शासनाने दिलेल्या वेळापत्रकानुसार  सप्टेंबर महिन्यासाठी कृषीपंप व सिंगल फेज वाहीनींना दिवसा व रात्री सलग आठ तास  चक्राकार पध्दतीने वीजपुरवठा करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीमध्ये याबाबत अशासकीय सदस्यांनी विचारणा केली होती.

      यामध्ये जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार याबाबतचे वेळापत्रक त्यांना उपलब्ध करून देण्यात आले.तसेच राष्ट्रीय सूचना केंद्राला (एनआयसी) ला हे वेळापत्रक त्यांच्या कार्यालयीन संकेतस्थळावर देखील प्रकाशीत करण्याचे निर्देश दिले.

         महावितरणच्या  भंडारा  विभागातर्गत भंडारा,पवनी ,तुमसर ,मोहाडी या तालुक्याचा समावेश होतो .या तालुक्यांना रात्री 23.55 ते 7.55 यादरम्यान आठ तास तर दिवसा 9.55 ते 17.55 या दरम्यान आठतास या दरम्यान चक्राकार पध्दतीने थ्री फेज वीजपुरवठा होतेा. तर महावितरणच्या साकोली  विभागातंर्गत साकोली, लाखनी,लाखांदुर या तालुक्यांना  रात्री 21.40 ते 5.40 तर दिवसा 7.40 ते 15.40 या दरम्यान सलग  थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येतो. तरी देखील शेतकरी बंधु व नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.