बाम्हणी गावात कलश यात्रेला उत्तम प्रतिसाद

बाम्हणी गावात कलश यात्रेला उत्तम प्रतिसाद

          भंडारा, 21 :मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत  पवनी. तालुक्यातील बाम्हणी ग्रामपंचायत येथे “कलश यात्रा” मोठ्या थाटामाटात काढण्यात आली.ग्रामपंचायत बाम्हणी येथून कलश यात्रेला जि.प.प्राथमिक शाळेतील मुलांच्या बँड पथकासह महिला भजन मंडळ यांनी भजनाद्वारे सुरुवात करून कलश यात्रेचा प्रारंभ केला. गावातून कलश यात्रा निघत असताना गावातील प्रत्येक घरातील महिलांनी आरती घेऊन कलशाची पूजा करून त्यामधे आपल्या घरातील, शेतामधील माती व तांदूळ टाकून पुजा करून कलश यात्रेमद्ये सहभागी झाल्या

        या कार्यक्रमाला प्रामुख्याने श्री. सिंगनजुडे गट विकास अधिकारी पं.स.पवनी आणि श्री.भोयर विस्तार अधिकारी पं.स.पवनी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच माधवी  सुरेश ईखार सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण गावभर कलश यात्रा काढण्यात आली. कलश यात्रेत श्री. यादवजी मेंगरे उपसरपंच, श्री. किशोरजी तलमले ग्रा.पं.सदस्य, श्री. सतिशजी नक्षिने, ग्रा. पं. सदस्य, सौ.दामिनी मेश्राम सदस्या, सौ. प्रमिला वंजारी सदस्या, सौ. उज्वला मेश्राम सदस्या, सौ.उर्मिला धारगावे सदस्या, श्री. धनंजयजी गिऱ्हेपुंजे सोसायटी अध्यक्ष, प्राथमिक शाळेतील शिक्षकवृंद तसेच शाळकरी मुले – मुली, ग्रामपंचायत कर्मचारीवृंद, महिला बचत गटातील महिला, भजन मंडळ, तरुण मुलं- मुली, गावकरी लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन कार्यक्रम आनंदात साजरा केला.