गरज विदयार्थाना पुस्तक वाटप

गरज विदयार्थाना पुस्तक वाटप

भंडारा:- दिनांक १३/०९/२०२३ रोजी पोलीस स्टेशन वरठी हद्दीत हनुमान मंदीर वरठी येथे छत्रपती शिवाजी महाराज लायब्ररी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी यांच्या संकल्पनेतून व श्री. सतीश श्रीवास्तव सनफ्लंग कंम्पनी यांच्या मदतीने पोलीस भरती, तलाठी भरती, एमपीएससी करणा-या मुलांना पुस्तक भेट देण्यात आली..

यावेळी उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. अशोक बागुल, मोहाडी सभापती रितेश वासनिक, श्री. गुप्ता सर सनफ्लंग कंम्पनी वरठी, वरठी ठाणेदार सपोनि. अभिजीत पाटील यांचे उपस्थितीत गरजु विद्यार्थ्याना पुस्तके भेट देण्यात आले. यावेळी ५० ते ६० विद्यार्थी हजर होते.