हत्या करणाऱ्या आरोपीस आजिवन कारावास

हत्या करणाऱ्या आरोपीस आजिवन कारावास

पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे फिर्याद दाखल करण्यात आली की, प्रकरणातील आरोपीतांनी फिर्यादीचे घरी येवुन फिर्यादीस शिवीगाळ केली व यातील मृतकला जिवाने मारण्याची धमकी दिली. व दिनांक २६/१०/२०१९ चे १४/०० वा. दरम्यान यातील आरोपीतांनी मृतक अक्षय उर्फ प्रेम बलवंत मुन वय १९ र्का यास जुन्या वादावरून परत भांडण करून मृतकाचे शरीरावर चाकुने वार करून व गळा कापुन खुन केला. अशा फिर्यादीचे तक्रारी वरून नमुद कलमान्वये पोस्टे चंद्रपूर शहर येथे गुन्हा नोंद केला व सदर गुन्हयाचा तपास श्री अनुज तारे सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधीकारी मुल यांनी केला असुन प्रकरणातील आरोपीतां विरूध्द सबळ साक्षपुरावा गोळा करून गुन्हयाचा योग्य तपास करून आरोपी विरूध्द दोषारोपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सदर खटला मा. डी.जे.३ कोर्ट विद्यमान पी.जी. भोसले सत्र न्यायालय चंद्रपूर यांचे कोर्टात आरोपी विरूध्द सबळ साक्षपुरावे नोंदविण्यात आले.

आज दिनांक २१/०३/२०२४ रोजी आरोपी १) साजन उर्फ बोंदया रंजीत डोंगरे वय १९ र्क, २) राजन उर्फ गुलशन रंजीत डोंगरे वय २१ र्का ३) शेख जमीर शेख जलील कुरेशी वय ३१ वर्ष तिन्ही आरोपीतास कलम ३०२, ३४ भादवी अन्वये आजीवन सश्रम कारावास व ५००० रू. दंड, दंड न भरल्यास प्रत्येकी १ महीना अतिरिक्त कारावास उशी शिक्षा देण्यात आली.

सदर गुन्हयात सरकारतर्फे सहा. सरकारी अभियोक्ता आसिफ शेख तसेच कोर्ट पैरवी अधीकारी म्हणुन पोहवा संतोश पवार ब.न.७८३ पोस्टे चंद्रपुरशहर यांनी मोलाची कामगीरी बजावली.