सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, पुणे यांच्याशी प्रशासनाचा सामंजस्य करार

जिल्हा विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, पुणे यांच्याशी प्रशासनाचा सामंजस्य करार

सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, पुणे यांच्या चमुची जिल्ह्यातील विविध भागधारकांशी चर्चा

       भंडारा, दि.14:जिल्ह्याचा विकास आराखडा तयार होत असून त्या आराम तो आराखडा अधिक अचूक व शाश्वत विकासाचा ठरावा यासाठी सिम्बॉयसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या मातब्बर शैक्षणिक संस्थेची चमू जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून वेगवेगळ्या भागधारकांशी संवाद करत क्षेत्र पाहणी केली . सिम्बॉयसिस स्कूल तर्फे उपसंचालक डॉ. सुदीपा मजुमदार  प्राध्यापक डॉ. चांदनी तिवारी, प्राध्यापक डॉ. निहारिका सिंग, सोबतच सीएम  फेलो निलेश साळुंखे यावेळी उपस्थित होते.

          महाराष्ट्र सरकारने 2027 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर बनविण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. या उद्दिष्टामधे भंडारा जिल्ह्याचे जास्तीत जास्त योगदान कसे देता येईल यासाठी जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विकास आराखडा बनविण्याचे काम चालू आहे. या कामामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत संस्थांची मदत घेण्याचा अनुषंगाने पुण्याच्या सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉॉमिक्स यांच्याशी जिल्हा प्रशासनातर्फे सामंजस्य करार करण्यात आला आहे.

         याअंतर्गत या संस्थेच्या उच्चपदस्थ चमूने अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. श्रीपती मोरे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध भागधारकांशी चर्चा केली. यामध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबतच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, शेतकरी, पशुपालक, उद्योजक, महिला बचत गट इत्यादींचा समावेश होता. याप्रसंगी सिम्बायोसिस स्कूल ऑफ इकॉनमिक्स च्या डॉ. चांदणी तिवारी म्हणाल्या की जरी भंडारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे महाराष्ट्राच्या तुलनेत फक्त 1.2% असेल आणि जिल्ह्याची लोकसंख्या 1.0

       6% असली तरी जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेली नैसर्गिक संसाधने आणि जिल्ह्याचे धोरणात्मक स्थान लक्षात घेता थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे जिल्हा हळूहळू शास्वत प्रगती करून महाराष्ट्राच्या विकासामध्ये मोठे योगदान देऊ शकतो.

       आज मानेगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाना, गराडा येथील गौशाळा, आसगाव येथील चौरास शेतकरी उत्पादक कंपनी तसेच भंडारा येथील ब्रास कंपनी इत्यादी ठिकाणी या चमूने भेटी दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली.