आश्रमशाळेतील शिक्षकांची क्षमता चाचणी परीक्षा 17 सप्टेंबरला
भंडारा,दि.14 :जिल्ह्यातील शासकीय आश्रम शाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शिक्षकांची आता चाचणी या 17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळावे, आदिवासी कल्याणात्मक योजनांची माहिती तळागळापर्यतच्या सामान्य नागरिकापर्यंत पोहोचावी याकरिता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
तसेच विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा याकरीता उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वयं-संरक्षण, योगा, चित्रकला, हस्तकला, इग्लिश स्पिक इत्यादीचे प्रशिक्षण देण्यात आले. भविष्यवेधी शिक्षण प्रणालीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात येत आहे.
त्याकरीता शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षकांचे भविष्यवेधी शिक्षण प्रणाली संबंधात प्रशिक्षण देण्यात आले. तसेच विषय मित्र यांचे सुध्दा प्रशिक्षण घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्याअध्ययनस्तर निश्चिती करीता दर 15 दिवसांनी अध्ययनस्तर निश्चिती परिक्षा घेण्यात येत आहे.
या परिक्षेद्वारे कमी प्रगत आढळून आलेल्या विद्याथ्यांना विशेष मार्गदर्शन व भविष्यवेधी शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून अध्ययन स्तर उंचावण्यात येत आहे. व त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. संपूर्ण राज्यामध्ये सर्व आश्रमशाळेतील 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्याची ऑगस्टमध्ये क्षमता चाचणी घेण्यात आली आहे. यावर्षी वर्ग 12 वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांचे JEE/NEET परीक्षेचे विशेष वर्ग आयोजन करण्यात आलेले आहे.
त्याकरीता दिनांक 01.09.2023 रोजी चाळणी परीक्षा घेण्यात आली. कमी गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर JEE/NEET परीक्षेचे विशेष मार्गदर्शन वर्ग घेऊन नोट्स पुरवठा करण्यात येणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याकरीता शिक्षक सुध्दा सक्षम असावयास हवे. त्याकरीता शिक्षकांचे विशेष प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच उत्कृष्ठ शिक्षकांचा शिक्षक दिना निमित्त सत्कार करण्यात आला.
संपूर्ण राज्यभर सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील वर्ग ली ते 12 यो पर्यंत शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची क्षमता परीक्षा दिनांक 17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. भंडारा जिल्हयातील सर्व आश्रमशाळेतील सर्व शिक्षकांची परीक्षा न. प. गांधी विद्यालय, भंडारा, येथे आयोजित करण्यात आली आहे. या परीक्षेमध्ये उत्कृष्ठ यश संपादन करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.