लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी

         भंडारा, दि.17:भारत निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 चा निवडणूक काल  कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.

         त्यानुसार अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी आशा पठाण यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 21 अन्वये भंडारा जिल्ह्याच्या संपूर्ण क्षेत्रात सर्व प्रकारचे शस्त्र बाळगण्यास बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश पारित केले आहे. हे आदेश तात्काळ लागू झालेले आहेत .तसेच सर्व शस्त्रास्त्र परवानाधारकांनी त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे संबंधीत क्षेत्राचे पोलीस स्टेशन अधिकारी, यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

          हे आदेश बँकांच्या सुरक्षेकरता नेमण्यात आलेले सुरक्षा रक्षक, पोलीस विभागाकडून ज्याना शस्त्र पुरवण्यात आली आहे असे पोलीस विभागात कार्यरत असलेले कर्मचारी, लष्करी- निमलष्करी जवानाकडे असलेली शस्त्रास्त्रे,  मॅग्नीज ऑर इंडिया लिमिटेड यांच्याकडे सुरक्षा रक्षक यांना सदर आदेशातून सूट देण्यात आलेली आहे. जर अशा व्यक्ती हिंसाचारात सहभागी आढळल्यास व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अडचण निर्माण करत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तींची शस्त्रास्त्रे अडकवून ठेवन्यास जिल्हा प्रशासनास कोणताही प्रतिबंध असणार नाही.

           प्रशासनाकडे जमा केलेली सर्व शस्त्रास्त्रे पोलीस विभागाकडून निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एका आठवड्याचे संबंधित परवानाधारकास परत करावीत,  असे सदर आदेशात नमूद आहे.