साकोली तालुक्यातील शेतक-यांनी ई-पीक पाहणी करावी

साकोली तालुक्यातील शेतक-यांनी ई-पीक पाहणी करावी

         भंडारा, दि. 12 :शेत पिकाचे नुकसान झाल्यास त्या शेतपिकाचे नुकसान भरपाई मिळण्यासज्ञठी सातबारा ला पिक नोंदणी  करणे आवश्यक आहे.याकरीता शेतक-यांनी ई-पीक पाहणी करून घ्यावी,असे आवाहन तहसीलदार निलेश कदम यांनी केले.

      साकोली तालुक्यात एकुण शेती खातेसंख्या 29882 असून शेतकऱ्यांनी भात पिकाबरोबर इतर पिकाची लागवड केलेली आहे.लागवड केलेल्या पिकांचे शेती खात्यापैकी एकुण 16873 शेती खाते संख्येची मोबाईलॲप द्वारे इत्यादी पिक पाहणी केलेली आहे.

      तसेच शेतपिकाखालील सर्वसाधारण पेरणी क्षेत्र 19669.92 हे आर आहे.त्यापैकी 13361.15 हे आर शेतपिकाचे मोबाईल ॲपव्दारे ई-पीक पाहणी झाले आहे.सात सप्टेंबरपर्यत ई-पीक पाहणी झालेल्या क्षेत्राची 67.93 टक्के एवढी असुन ई-पीक पाहणी करण्यास शिल्लक खातेदार संख्या 13 हजार आहे.ही पाहणी करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यत आहे.तरी या 13 हजार शिल्लक खातेदार शेतक-यांनी ई-पी पाहणी करण्याचे आवाहन तालुका प्रशासनाने केले आहे.