वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील निर्लेखीत उपकरणे व साहित्यांचा जाहीर लिलाव

वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील निर्लेखीत उपकरणे व साहित्यांचा जाहीर लिलाव

Ø 29 फेब्रुवारीपर्यंत ईच्छुक खरेदीधारकांकडून दरपत्रक आमंत्रित

चंद्रपूर,दि.26 : उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथील रुग्णालयीन निर्लेखीत उपकरणे व जडसंग्रह साहित्याचे स्थानिक स्तरावर दरपत्रके मागवून जाहीर लिलाव करण्यात येत आहे. सदर निर्लेखनपात्र जडसंग्रह साहित्याची किंमत 37 हजार 553 तर निर्लेखनपात्र उपकरणांची किंमत 61 हजार 844 ठरविण्यात आली आहे.

खरेदीधारकांनी आपले दरपत्रक ठरविलेल्या किंमतीपेक्षा ज्या खरेदीधारकांचे दर जास्त असेल त्याच खरेदीधारकास सदर साहित्य व उपकरणे देण्यात येतील. ईच्छुक खरेदीधारकांनी आपले दरपत्रक बंद लिफाफ्यासह दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथील कार्यालयात सादर करावेत. असे वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी कळविले आहे.