पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे शांतता समिती मिटींग

पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे शांतता समिती मिटींग

भंडारा – दिनांक ०९/०९/२०२३ रोजी १२.५० ते १४.०० वा. पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे पोलीस अधीक्षक भंडारा मा. श्री. लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधीकारी भंडारा डॉ. अशोक बागुल यांनी येणारे सण उत्सव शांततेत पार पाडण्याकरीता शांतता समिती मिटींग घेण्यात आली.

यावेळी सर्व पोलीस पाटील, तंटा मुक्ती सदस्य, गंणेश मंडळे, डीजे वाला, ईद ए मिलादुन्नबी आणि इतर स्टेक होल्डर्स एमएससीबी, महाराष्ट्र पोलुशन कन्ट्रोल बोर्ड, सरपंच, पिडब्लुडी, इ. अधिकाऱ्यांची शांतता समितीची बैठक घेतली. बैठकी दरम्यान शंका, अडचणी, ऐकून घेतल्या – सर्वाचे निरसन केले. योग्य सूचना दिल्या, सर्व संबधितांना १४९ नोटिसा बजावल्या, दररोज प्रस्तावित योजनेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. सर्व आश्वासन दिलेले शांततेत प्रतिष्ठापना, उत्सव आणि गणेशोत्सव ईद दुनबी, पोला ईत्यादीची इ. बाबत आवश्यक सूचना देण्यात आले.