आता एक खिडकीद्वारे मिळणार गणेशोत्सवाच्या सर्व परवानग्या

आता एक खिडकीद्वारे मिळणार गणेशोत्सवाच्या सर्व परवानग्या

जिल्हा प्रशासनाचा उपक्रम

भंडारा, दि. 1 :  येत्या काही दिवसातच  विघ्नहर्ता गणपती बाप्पांचे आगमन  होणार आहे. सामान्यांमध्ये गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो.हे लक्षात घेता व गणेशोत्सवाला मिळणारा प्रतिसाद बघता सामान्य नागरिक,विविध सार्वजनिक गणेश मंडळे यांना  गणेश उत्सवासाठी लागणाऱ्या सर्व  परवानग्या आता जिल्हा प्रशासनाद्वारे एक खिडकी योजनेतूनच मिळणार आहेत.

एक खिडकी योजनेद्वारे विविध परवानग्या एकाच ठिकाणाहून मिळणार आहेत ,यामुळे सामान्य नागरिकांचा वेळ वाचणार आहे.नुकतीच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी व मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांसह  झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी एक खिडकी योजने विषयीविस्तृत माहिती दिली.

सामान्य नागरीकांनी गणेश उत्सव कार्यक्रमाची परवानगी घेतांना संबंधित पोलीस स्टेशनला अर्ज करावा.

अर्ज करतांना  पोलीस विभागाने  दिलेल्या नमुन्यात अर्ज सादर करावा. अर्ज करतांना मंडळाचे नाव, गणेशोत्सव कालावधी, स्थापन करण्याची जागा , मंडळाचे रजिस्टर नंबर, अध्यक्षाचे संपूर्ण नाव व पत्ता,  आधारकार्ड, सचिवांचे पूर्ण नाव व पत्ता, मंडळाचे पाच पदाधिकारी यांचे संपूर्ण नाव व पत्ता, विसर्जन मिरवणुकीचा दिनांक व वेळ, मिरवणुकीमध्ये वाहनांची संख्या व क्रमांक, मिरवणुकीचा मार्ग, गणेशमुर्तीचे संरक्षण करण्याकरीता नेमण्यात आलेल्या स्वयंसेवकांची संपूर्ण नाव व पत्ता , धर्मदाय आयुक्त यांची परवानगी घेतली असल्यास सोबत जोडणे,   जागा खाजगी असल्यास जागा मालकाचा नाहरकत दाखला इत्यादी माहिती व कागदपत्रासह  अर्ज नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये जमा करावा.           संबंधित विभागाचे  नोडल अधिकारी यांनी  दस्ताऐवज  एक खिडकी यंत्रणेकडे सादर करावे.

पोलीस विभाग-  (अ) ध्वनी क्षेपकाबाबत नाहरकत प्रमाणपत्र

                        (ब) वाहतुक शाखा भंडारा यांचा नाहरकत प्रमाणपत्र

 नगरपरिषद/ग्रामपंचायत-   (अ)नाहरकत दाखला

                                      (ब)सर्वसाधारण भरणा पावती (500 रुपये)

 विद्युत विभाग-    तात्पुरती विद्युत  कनेक्शन घेतल्याची शुल्क पावती

 सार्वजनिक बांधकाम विभाग-  आवश्यक असल्यास सार्वजनिक विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी देखील गणेश मंडळाकडून प्राप्त अर्जावर लवकरात लवकर पोलिसांनी कार्यवाही करून नागरिकांना वेळेत आणि सुलभ पद्धतीने परवानगी देण्याच्या सूचना अधिनस्त पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या.