सिन्देवाही | मरेगाव येथे ‘करिअर गायडेन्स’ वर कार्यशाळा 

सिन्देवाही,मरेगाव येथे ‘करिअर गायडेन्स’ वर कार्यशाळा 

सिंदेवाही – पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मरेगाव येथील विद्यार्थ्यांसाठी भविष्यवेध उपक्रमान्तर्गत आयोजित करियर गायडेन्स विषयावरील कार्यशाळा नुकतीच पार पडली .

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस .डी .सलामे होते .मुख्य अतिथी शिक्षणतज्ञ प्रा .भारत मेश्राम ,बामसेफचे विजय रामटेके व आय.आय .टी दिल्लीचा विद्यार्थी राहुल सलामे व शिक्षक दौलत शिंपी विचारमंचावर उपस्थित होते .

याप्रसंगी अतिथी मार्गदर्शकांनी महिला कायदे व आत्मसुरक्षा ,तंत्रज्ञान शिक्षण ,स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रातील व्यवसाय नि रोजगार संधी विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमाचे संचालन अध्यापक कापसे यांनी केले .तर अधीक्षक सोयाम यांनी आभार मानले .वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .या कार्यक्रमाच्या शाळेतील यशस्वीतेसाठी शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले .