महारोजगार मेळावा 8 सप्टेंबरला

महारोजगार मेळावा 8 सप्टेंबरला

         भंडारा, दि. 1 :  जिल्ह्यातील सुशिक्षित बेराजगार युवक व युवतीना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर यांचे संयुक्त विद्यमाने 8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर या ठिकाणी पंडित दीनदायल उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

        या रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या सहभागी होणार असून या माध्यमातून  सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतीना मोठया प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.त्या मेळाव्याच्या अनुषंगाने नियोक्त्यांनी त्यांचेकडील रिक्तपदांची माहिती कौशल्य विकास,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील त्यांचे लॉगीनमधून पंडित दीनदायल उपाध्याय महारोजगार मेळावा  येथे अधिसूचित करावीत.

          तसेच नोकरीइच्छुक महिलांनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करावा.तसेच  मेळाव्याच्या ठिकाणी मुलाखत व तत्सम प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड होणार असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने मेळाव्याच्या दिवशी व वेळेत शैक्षणिक कागदपत्राच्या छायाकिंत प्रती व पासपोर्ट फोटोसह उपस्थित राहावे,

           या मेळाव्याचा जिल्हयातील अधिकाधीक  गरजू युवक व युवतीनी या सुवर्णसंधीचा आवश्यक लाभ घ्यावा, तसेच याबाबत काही अडचण शंका असल्यास कार्यालयाच्या 07184-252250 व मोबाईल क्रमांक 7620378924 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र,भंडारा येथील सहाय्यक आयुक्त सुधाकर झळके यांनी कळविले आहे.