पोलिस अधिक्षक कार्यालयामार्फत कौशल्य विकासाचे  प्रशिक्षण इच्छुकांनी 10 सप्टेंबरपर्यत अर्ज करावे

पोलिस अधिक्षक कार्यालयामार्फत कौशल्य विकासाचे  प्रशिक्षण इच्छुकांनी 10 सप्टेंबरपर्यत अर्ज करावे

            भंडारा,दि.30 : पोलिस अधिक्षक कार्यालयामार्फत जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून  किमान कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयातील 15 ते 45 वयोगटातील रोजगार,स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

          तसेच जिल्हयातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती,परंपरागत व्यवसाय नैसर्गिक संसाधने तथा साधन सामुग्री इत्यादीच्या आधारे जिल्हयातील स्वयंरोजगारासाठी अधिक प्रशिक्षणाचे विशिष्ट कोर्सेस राबविणे तसेच मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करुन या क्षेत्राच्या कौशल्याच्या मागणीनुसार कौशल्य विकास  प्रशिक्षण प्राप्त उमेदवारांना पोलिस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने रोजगार,स्वयंरोजगार मिळण्याकरिता सहाय्य करण्यात येईल.व प्रशिक्षण केलेल्या उमेदवारांना पोलिस विभागासोबत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल.या उद्दिष्टांकरिता किमान कौशल्य उपलब्ध प्रशिक्षण सुरु होणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक लोहीत मतानी यांनी दिली.

          तरी  याबाबतचे नि:शुल्क प्रशिक्षण घेण्याकरिता पहिल्या टप्प्यात लाईट मोटार व्हेईकल ड्रायव्हर  60 जागा आहे.त्यां प्रशिक्षणाचा  कालावधी 2 महिने ,तर अनआर्मड सेक्युरिटी गार्ड पदाच्या  30 जागा प्रशिक्षण कालावधी  दोन महिने  आहे.ज्या उमेदवारांची निवड ही मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल.तरी भंडारा जिल्हयातील 15 ते 45 वयोगटातील इच्छुक युवक-युवतींनी पोलिस अधिक्षक कार्यालय,भंडारा येथे लघुलेखक कक्ष स्टेनो यांना प्रत्यक्ष भेट घेवून प्रवेश अर्जाच्या नमुन्यात 10 सप्टेंबर 2023 पर्यत माहिती भरुन द्यावी.

        तसेच अर्जासोबत आधार कार्ड व शैक्षणिक कागदपत्राच्या छायंकित प्रती जोडून सादर करावे,अधिक माहितीसाठी पोलिस अधिक्षक कार्यालय,भंडारा यांचे दुरध्वनी क्रमांक 07184-252440 येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा,असे आवाहन पोलिस अधिक्षक लोहित मतांनी यांनी कळविले आहे.