मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी इमारत उपलब्ध

मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी इमारत उपलब्ध

       भंडारा दि.30 : समाज कल्याण विभागाच्या मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी शासनाने स्वत: इमारत भाडयाने घेवून जिल्हास्तरावर मुलांचे एक व मुलीचे एक असे  दोन वसतिगृह सुरु करावयाची आहेत.त्यासाठी वसतिगृह शैक्षणिक सत्र 2023-24 पासून सुरु करावयाचे आहेत.

       तसेच प्रति वसतिगृहांची मान्य संख्या 100 असून भंडारा जिल्ह्यात इतर मागास प्रवर्गातील मुलींच्या वसतिगृहाकरिता 60 विद्यार्थी क्षमतेची व मुलांच्या वसतिगृहाकरिता 100 विद्यार्थी क्षमतेची इमारत उपलब्ध झालेली आहे. या इमारत मंजुरीचे प्रस्ताव प्रादेशिक उपसंचालक,इतर मागास बहुजन कल्याण विभाग,नागपूर यांचेकडे सादर करण्यात आलेला असून इमारतीस मंजूरी प्राप्त होताच शैक्षणिक सत्र 2023-24 करिता मुलींचे व मुलांचे वसतिगृह सुरु करण्यात येणार आहे.असे आवाहन सहाय्यक आयुक्त, बाबासाहेब देशमुख समाज कल्याण विभागानी कळविले आहे.