“सकस आहार” (तिरंगा थाळी) रेसिपी स्पर्धेचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन  

“सकस आहार” (तिरंगा थाळी) रेसिपी स्पर्धेचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन  

 

भंडारा दि. 25: महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नवतेजस्विनी कार्यक्रमांतर्गत हेल्थ व न्युट्रीशियन या घटकांतर्गत आरोग्य व शिबीर आयोजित करण्यात येते, ज्या महिलांचे HB कमी आहे त्या महिलांचे हिमोग्लोबीन (HB) तपासणी करणे, त्याचबराबर महिलांना स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेल्या खादयपदार्थांच्या माध्यमातून सकस व पौष्टिक आहाराची माहिती देणे. याकरीता “सकस आहार” (तिरंगा थाळी) रेसिपी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा उद्या दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता पोलीस मुख्यालयाचे कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षिस वितरण जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते होणार आहे.

 

ग्रामीण क्षेत्रात ॲनेमिया मुक्त गाव ही संकल्पना रुजविण्यासाठी गटांच्या बैठकांमध्ये “तिरंगा थाळी” या संकल्पनेबाबत प्रचार व प्रसार करण्यात येते व यांची सांगड “न्युट्री गार्डन” सोबत करण्यात येते महिलांमार्फत परसबागेमध्ये उत्पादित करण्यात आलेल्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे यांचा समावेश करणे. “सकस आहार” (तिरंगा थाळी) रेसिपी स्पर्धेच्या माध्यमातून बचत गटातील महिलांमध्ये आहाराबाबत जागृती करुन त्यांना सकस व संततुलीत आहार घेण्यास प्रवृत्त करण्यात येते.