सामाजिक न्याय विभागाकडून पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

सामाजिक न्याय विभागाकडून पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

        भंडारा, दि. 13 : समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वंयसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी सामाजिक न्याय विभागामार्फत सन्मानित करण्यात येते. सन 2019-2020, 2020-21 व 2021-2022 या आर्थिक वर्षात विविध पुरस्कारांसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. तथापि, सन 2019-20 या कालावधीत ज्या अर्जदारांनी अर्ज केला त्यांनी त्या कालावधीसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता  नाही.

            सामाजिक न्याय विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे मानकरी ठरविण्याकरिता इच्छुक स्वंयसेवी संस्था व व्यक्ती यांनी QR कोड स्कॅन करुन संबधित अर्ज भरावा. तसेच विहित नमुन्यातील अर्ज सहाय्य्क आयुक्त, समाज कल्याण भंडारा यांचेकडे (3 प्रतीत संपूर्ण प्रस्ताव ) 15 मे 2022 पर्यंत सर्व नमुद कागदपत्रांसह सादर करावे, असे  सामाजिक न्याय विभागाने कळविले आहे.