बाल संरक्षण विषय मार्गदर्शन कार्यक्रमात गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह न करण्याची शपथ

बाल संरक्षण विषय मार्गदर्शन कार्यक्रमात गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह न करण्याची शपथ

 महिला व बाल विकास कार्यालय व जिल्हा प्रशासनाच्या वतीने बाल संरक्षण विषय कायद्याची जणजागृती

गडचिरोली, दि.25: दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोज गुरुवार लालाजी पाटील खेवले विद्यालय मौशिखांब येथे बाल संरक्षण विषय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ता जयंत जथाडे यांनी शाळेत शिकत असलेल्या वर्ग 5 ते 10 च्या विद्यार्थ्यांना बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम 2015 व लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 या कायद्याविषयी व होणाऱ्या शिक्षेबाबत माहिती, तसेच बालविवाह न करण्याची शपथ देऊन बालविवाहाचे दुष्परिणाम, याविषयी जयंत जथाडे यांनी मार्गदर्शन केले.
गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब येथील लालाजी पाटील खेवले विद्यालय येथे बाल संरक्षण विषय मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बाल संरक्षण विषय कायद्यांची माहिती जाणून घेतली. तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये मुलीचे 18 वर्षे व मुलाचे 21 वर्षे वय पूर्ण झाल्याशिवाय बालविवाह करणार नसल्याची शपथ विद्यार्थ्यानी घेतली.
तसेच बालकाच्या मनाविरोधी बळजबरीने कमी वयात लग्न लावून दिलं जातं असेल किंवा कुठेही बालविवाह होत असेल तर जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय व चाईल्ड लाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती बालकांना देण्यात आली.

सदर उपक्रम जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्यां मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य आर एस तोराम प्रमुख पाहुणे श्री.तोडासे, श्री.वाघरे, श्री. उसेंडी, श्री.मडावी, श्री.वासेकर, श्री. बारसागडे लिपिक, श्री. खेडेकर शिपाई, तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे संचालन के एस मडावी तर आभार प्रदर्शन एच एस तोडसे यांनी मानले.