दि.17 सप्टेंबर 2023 रोजी, कविवर्य सुरेश भट सभागÞह, रेशिमबाग मैदान नागपुर येथे “इंडस्ट्रीमिट” चे आयोजन

दि.17 सप्टेंबर 2023 रोजी, कविवर्य सुरेश भट सभागÞह, रेशिमबाग मैदान नागपुर येथे “इंडस्ट्रीमिट” चे आयोजन

गडचिरोली, दि.25: महाराष्ट्रातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हे अधिक प्रभावी माध्यम आहे. सदर रोजगार मेळाव्यात उद्योजक व नोकरी इच्छूक उमेदवार यांना एका व्यासपीठावर आणून उद्योजकांकडील रिक्तपदांसाठी मुलाखती आयोजित करुन तात्काळ नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. तसेच, उद्योजकांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते. यासाठी जास्तीत-जास्त उद्योजकांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होणे गरजेचे आहे.
राज्यातील बेरोजगार उमेदवारांना अधिक रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचेमार्फत दि.16 नोव्हेंबर, 2022 रोजी मा.राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा.मंत्री यांचे उपस्थितीत नामांकित 44 इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज समवेत, दि.20 एप्रिल, 2023 रोजी मा.मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, अपर मुख्य सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व आयुक्त यांचे उपस्थितीत 16 उद्योजक व प्लेसमेंट एजन्सीज समवेत सुमारे १ लाख ३५ हजार नोक-या उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. दि. 15 जुलै 2023 रोजी काशिनाथ घाणेकर सभागÞह ठाणे येथे इंडस्टÅ मीट हा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये 289 उद्योजकांसोबत सुमारे 2 लाख नोक-या उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार झाला तसेच दि. 9 जून, 2023 रोजी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, बाणेर रोड, पुणे येथे इंडस्ट मीट हा कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये 141 उद्योजकांसोबत सुमारे 1 च्या वर लाख नोक-या उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार झाला.
सदर सामंजस्य करारनामे करण्यात आलेले उदयोजक (Manufacturing, Media and entertainment, Automobile, Food, Home Appliance, Security, Retail, Insurance, Real Estate, Fire Safety,BPO, KPO,Cash Management, Corporate placement/Staffing Company/Staffing services/ Placement Agency/, etc.) या विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देत आहेत.
या विभागामार्फत मागील वर्षापर्यंत साधारणत: २०० मेळावे आयोजन करण्यात येत होते. परंतु, जास्तीत-जास्त उमेदवारांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सन २०२२-२३ पासून ६०० रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. तसेच, सन 2022-23 अखेर पर्यंत आयुक्तालयामार्फत विविध योजना व 557 रोजगार मेळाव्याद्वारेसुमारे २ लाख 83 हजार उमेदवारांची नोकरीसाठी निवड झालेली आहे.
उक्त दोन्ही दिवशी केलेले सामंजस्य करार हे मुख्यत: मुंबई व मुंबई नजिकच्या जिल्ह्यातील असून राज्यातील उर्वरित विभागातील उमेदवारांना सुद्धा रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने उदा.विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या विभागात अश्याच पध्दतीने इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज इ. समवेत सामंजस्य करारनामा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या अनुषंगाने “कौशल्य केंद्र आपल्या दारी” या संकल्पनेतून नागपुर विभागातील नामांकित इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदार इ. समवेत सामंजस्य करार करण्याकरिता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत दि.17 सप्टेंबर 2023 रोजी, कविवर्य सुरेश भट सभागÞह, रेशिमबाग मैदान नागपुर येथे “इंडस्ट्रीमिट” चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रम मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा.उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मा.मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, प्रधान सचिव, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहेत. जिल्हयातील विविध उद्योजकांना आवश्यकते कुशल/अकुशल मनुष्यबळ विनामुल्य प्राप्त्‍ होणे, उद्योगां/ आस्थापनां करिता मनुष्यबळाच्या मागणीबाबत मोफत जाहिरात प्रसिध्द करणे, उद्योजकांना रोजगार प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळवुन देणे, उमेदवारांना रोजगार प्राप्त करणे सोईस्कर होणे तसेच शासन आणी उद्योग समुहयांच्या त सामंजस्य/समन्वय साधणे हा याकार्यक्रमाचा मुख्य हेतु आहे.
तरी, महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच, इंडस्ट्रीजना आवश्यक कुशल/अकुशल मनुष्यबळ उपलब्ध होणेकरिता नागपुर विभागातील सर्वनामांकित उद्योजक, इंडस्ट्री असोसिएशन, प्लेसमेंट एजन्सीज, मोठ मोठे हॉटेल्स व हॉस्पीटल्स, मॉल्स, सिक्युरीटी एजन्सीज व मोठे लेबर कंत्राटदारयांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आयोजित “इंडस्ट्री मिट” कार्यक्रमामध्ये सहभागी शासना सोबत जास्तीत जास्त संखेने सामजस्य करार करून घ्यावे व आलेल्या संधीचा लाभ घेउन शासनास सहकार्य करावे. (तसेच रोजगार मेळाव्यात उद्योजकांनी उपस्थीत राहून आपल्याकडील रिक्तपदे उपलब्ध करून द्यावी व बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणेबाबत सहकार्य करावे) असे आवाहन जिल्हा कौशल्य, विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी केले आहे. याबाबत अधिक माहीतीसाठी 07132-222368 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा 8788327925भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.